परमहंस भालचंद्र महाराज संस्थान

श्री क्षेत्र कणकवली

परमहंस भालचंद्र महाराज ही एक देवत्व प्राप्त केलेली महान शक्ती आहे. आयुष्यभर तपसाधनेत मग्न असणारे आणि भक्तांची दुःखे निवारण करणारे भालचंद्र बाबा अखंड मौनधारी व दिगंबर अवस्थेत होते. बाबांच्या अखंड भक्तीने आणि समाधीस्थानाच्या दर्शनाने असंख्य भक्तांना बाबांच्या कृपेची प्रचिती येत आहे. बाबांच्या भक्तांमध्ये सर्व जाती, धर्म व पंथाचे भक्त आहेत. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबांचे भक्त आपणास कृपाछत्र लाभावे याकरिता परमहंस भालचंद्र बाबांच्या तपश्चर्यास्थान व समधीस्थानाच्या दर्शनाकरिता आश्रमात नेहमीच येत असतात.

परमहंस भालचंद्र महाराज ११६वा जन्मोत्सव सोहळा

null

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण या गावी श्री. परशुराम ठाकूर आणि सौ. आनंदीबाई या मात्यापित्यांच्या पोटी ८ जानेवारी १९०४ या वर्षी प.पू. भालचंद्र महाराजांचा जन्म झाला. बाबांचे काही जीवन मुंबईत गेले. लहानपणीच मातापित्यांचे देहावसान, मॅट्रीकच्या परिक्षेत आलेले अपयश, यामुळे निराशा आलेल्या बाबांच्या जीवनात अचानक वैराग्य प्राप्त झाले.

About Bhalchandra Maharaj Sansthan

संस्थान विषयी माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

null

प. पु. श्री भालचंद्र महाराज संस्थान मध्ये होणारे आगामी धार्मिक व संस्कृतिक कार्यक्रमाची माहिती मिळण्यासाठी येथे क्लिक करा.